Coronavirus

कोरोना आणि मानसिकता (Coronavirus & Mentality (Negativity ) 1

Coronavirus & Mentality (Horrible)

हि घटना आहे माझ्या गावातील आणि माझ्या गावच्या घराच्या शेजारील तसेच मित्राची आणि नातेवाइकांचीसुद्धा. अशाप्रकारे संमिश्र नाते असलेल्यांबरोबरोबर घडलेली घटना

Coronavirus मानसिकता : ह्या घटनेला मी मानसिकता हे नाव देणे उचित समजतो

ह्या घटनेतील महिला हि गावात कायमस्वरुपी राहणारी आहे, तिचे पती पोलीस सेवेमधून निवृत्ती होऊन जवळपास २० वर्षापेक्षा अधिक काळ लोटला आहे. एक प्रकारे पाहता हे कुटुंब सद्यस्तिथीला एक सदन कुटुंब आहे 
त्यांची सगळी अपत्य नोकरीधंद्यानिमित्त मुंबईला स्थिर झाली आहेत. आत्ता त्यांच्या नातीचे लग्न ठरले आणि तिचा साखरपुढा समारंभासाठी त्यांना बोलावण्यात आले आणि त्यासाठी ते दोघे उभयता मुंबई इथे रवाना झाली. पण नियतीने काही वेगळेच लिहून ठेवले होते. हा काळ आहे साधारण ऑक्टो-नोव्हे -२०१९ तेव्हा कोरोना नव्हता.

Coronavirus
Coronavirus Precaution

मुंबईत पोचल्यानंतर थोडे दिवस लोटले पण आत्ता कधीही आजारी नसलेले त्यांचे पती अचानक आजारी पडले सुरुवातीला जवळच्या दवाखान्यात नंतर रुग्णालयात नेण्यात आले पण त्यांना म्हणावा तास आराम पडत नव्हता. मुलांनी वडिलांना चांगल्यात चांगला डॉक्टर शोधून त्यांच्याकडे औषधे आणि उपचार चालू ठेवले . आपले आपल्या वडिलांवर असलेले प्रेम आणि त्याखातीर त्यांच्या मुलांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली कारण त्यांना एक आशा होती कि ह्यातून आपले वडील बाहेर पडतील. पण शेवटी ३-४ महिन्यानंतर त्यांचे निधन मुंबईला झाले.

त्यानंतर त्यांची आणि अंत्यविधी सगळी श्राद्ध हिंदू धर्माप्रमाणे करण्यात आली

हे लिहायला किंवा वाचायला खूप सोपे आहे पण तो जो ३-४  महिन्याचा जो काळ होता तो खूप मनाला वेदना देणारा होता. पण घटना इथेच संपली नाही.

मला जे तुम्हाला सांगायचे आहे ते पुढे आहे.

ह्या घंटनेनंतर काही दिवसातच होळीचा सण आला आणि माझे गाव कोकणातले आहे आणि इथे हे सण खूप श्रद्धेने साजरे केले जातात आणि अशी परंपरा आहे कि ह्या सणांच्या दिवशी कोकणातील घरे सहसा बंद नसतात जर काही लोकांना गावी जाता आले नाही तर निदान ते शेजारी किंवा नातेवाईक जवळ असतील तर ज्या काही  पारंपरिक गोष्टी ह्या सणाच्या काळात कराव्या लागतात त्यांच्या कडून करून घेतले जाते.

तर त्यानंतर त्यांचा एक मुलगा गावी आपल्या घरी गेला. आई ला बरोबर घेऊन गेला नाही कारण ती तिथे एकटी पडेल आणि आपल्या पतीचाच विचार करत राहील. दुःखी असल्यामुळे त्यांचा मुलगा जसे जमेल तसा होळी सणाला हजेरी लावून परत मुंबईला परतला.

दरम्यानच्या काळात कोरोनाने आपल्या देशात प्रवेश केला होता. ह्या महिलेला गावी राहण्याची सवय असल्यामुळे तिला गावी जायची ओढ लागली होती. इथे तिचे मन करमेना. त्या Coronavirus काळातच lockdown चालू झाले त्यामुळे त्या इथे अडकल्या. त्यानंतर काही नियम ठेवून सरकारने lockdown क्षिथील केल्यानंतर त्यांनी आपल्या एका मुलाच्या कुटुंबासहित आपले गाव गाठले.

पण सगळीकडे गावाची मंडळींची मनस्थिती मुंबईतून आलेल्या लोकांबद्दल चांगली नव्हती. आणि जो कोण विलगीकरणाशिवाय गावी येऊन राहील त्यांच्या विरोधात गावातले काही महाभाग लोके पोलीस स्टेशन ला तक्रार करून गुन्हे नोंदवत होते हे टाळण्यासाठी ह्या कुटुंबाने प्रशाशनाने जी सोय केली होती त्या गावच्या शाळेत राहण्याचे ठरवले आत्ता १-२ दिवस गेले असतील नसतील तोच ह्या महिलेची तब्बेत बिघडली लगेचच त्यांनी कशाचीही पर्वा न करता लागलीच तालुक्याच्या ठिकाणी सरकारी रुग्णालयात नेण्यात आले पण तिथे त्यांची लक्षणे बघता पुढे जिल्हा रुग्णालयात न्यावे असे सांगण्यात आले.

परंतु जिल्हा रुग्णालय २ तासांच्या अंतरावर आहे, त्यामुळे एवढ्या लांबवर नेणे जिकरीचे होते. म्हणून त्यांनी खाजगी रुग्णालयात नेले पण तिथेही तोच पाढा पडवण्यात आला. शेवटी पर्यायाअभावी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले तिथे न्यूमोनियाचे निदान करण्यात आले. आणि कोरोनाची पण तपासणी घेण्यात आली. ५-६ दिवसानंतर अखेरीस त्या महिलेने आपला प्राण सोडला अशाप्रकारे दोन्ही उभयतांचा मृत्यू ६ महिन्याच्या आतच झाला.

ह्यापुढे काळजीपूर्वक वाचा

Coronavirus & Mentality

जेव्हा ती महिला मृत झाली तेव्हा डॉक्टरांनी तिचा मृत्यू न्यूमोनियामुळे झाला असे घोषित केले. आणि मृतदेह त्यांच्या मुलांकडे सुपुर्द केला.

सगळीकडे कोरोनाची लाट असल्यामुळे प्रथम गावातील काही म्होरक्यांनी तो मृतदेह गावात आणण्यास मज्जाव केला. ह्या सगळ्या घटनेवर गावात तो मृतदेह अग्नी देण्यासाठी आणायचा कि नाही आणायचा त्यांच्या मुलांना त्याच्या स्वतःच्या घरी यायला द्यायचे कि नाही द्यायचे ह्यासाठी अनेकदा मिटिंग (सभा) घेण्यात आल्या. पोलीस स्टेशन तसेच ग्रामपंचायतीत त्या कुटुंबाविरोधात तक्रार अर्ज करण्यात आले.

ज्या महिलेचा मृत्यू झाला ती महिला गावामध्ये कोणीपण आजारी पडला तर सर्वप्रथम ती कुठलाही भेदभाव न करता तिथे हजर व्हायची आणि प्रथमोपचार करायची. अशा महिलेविरुद्ध त्याच गावातली मंडळींनी अशाप्रकारची वर्तणूक दाखवली.

ज्यावेळी खरी मदत करायची होती तेव्हाच लोकांनी पाठ फिरवली आणि नुसती पाठ नाही फिरवली तर त्या महिलेच्या कुटूंबाला सोशल मीडिया वरून खूप मानसिक त्रास देण्यात आला किंवा झाला .

तिच्या मुलांनी ह्या असल्या त्यांच्या विरोधात निर्माण झालेल्या वातावरणामुळे स्वतःच्या आईच्या अंत्यविधी न करता गावच्या स्मशानभूमीमध्ये १-२ नातेवाईक घेऊन मृत शरीरास अग्नी दिला. त्यानंतरही गावातल्या लोकांनी त्यांना त्याच्या राहत्या घरात येऊ दिले नाही. परत त्यानं विलगीकरण जिथे केले गेले तिथे परत त्या शाळेत जाण्यास सांगितले. ह्या काळामध्ये गावातल्या कुठल्याही व्यक्तीने त्यांना साधे अन्न पण विचारले नाही.

एवढे झाले पण एवढ्यावर भागले नाही.

पुढे त्यांच्या मृत्यूनंतर ८ दिवसांनी त्या महिलेचा कोरोना तपासणी रिपोर्ट पॉसिटीव्ह आला. त्यानंतर वृत्तपत्र आणि सोशलमीडिया वर उलट सुलट मीठ मसाला लावून हे प्रकरण रंगवण्यात आले.

आत्ता तर आत्तापर्यंत जितका त्रास झाला होता त्यापेक्षा कैकपटीने त्या कुटुंबाला मानसिक त्रास झाला. त्यांनी स्वतःच्या आईला रुग्णालयात फिरवले म्हणून त्यांच्यावर आणि ज्या रिक्षाने तिला रुग्णालयात नेले गेले त्या रिक्षावाल्यावर सुद्धा गुन्हा नोंदीच्या बातम्या यायला लागल्या.

अशाप्रकारे हि घटना घडली जी कोणाला अपेक्षित नव्हती

हि जी घटना घडली ती एका मानसिकतेमुळे आणि माहितीचा अभाव असल्यामुळेच.

मुंबईमध्ये आजच्या घडीला हजारो रुग्ण आहेत तरीसुद्धा बाजारात जायला माणसे घाबरत नाही कारण स्पष्ट आहे त्यांना माहिती आहे कि कशाप्रकारे काळजी घेतली पाहिजे. त्यांची एक मानसिकता आहे कि आपण ह्यापद्धतीने काळजी घेतली तर आपल्यलाला हा आजार होण्याची शक्यता फार कमी किंवा न होण्याच्या बरोबर आहे.

इथे ह्या कुटुंबाला जो त्रास झाला किंवा देण्यात आला तो निवळ मानसिकतेमुळेच आणि हि मानसिकता का तयार झाली तर त्याबाबतीत असलेल्या ज्ञानाच्या अभावामुळे. तसेच प्रशासनाने योग्य ती सुविधा तालुका पातळीवर न केल्यामुळे जर योग्य तो उपचार आणि निदान वेळेवर झाले असते तर ती महिला आज जिवंत असती. ह्या सर्व घटनेमध्ये त्या कुटुंबाला मदत मिळायला हवी होती ती मिळालीच नाही उलट अन्याय झाला असे प्रकर्षाने दिसून येते.

जर मानसिकता त्या कोरोना रोगाशी लढा कसा करायचा किंवा कुठल्या काळजी घ्यायची हे जर नीटपणे  समजावून घेतले असते किंवा त्या महिलेचा मृत्यू झाल्यानंतर पोलीस स्टेशन आणि ग्रामपंचायतीत तक्रार देण्याऐवजी एखाद्या चांगल्या डॉक्टरला भेटून हि परिस्थिती कशी हाताळावी हे समजावून घेतले असते तर अशा ह्या गरजेच्या वेळी त्या कुटुंबाला सहकार्य करता आले असते. निदान सहकार्य नसेल जमत तर त्यांना जो तक्रारी करून त्रास देण्यात आला तो टाळू शकला असता.

मी हि घटना का सांगितली ? मानसिकता त्यामागे कारण आहे.

नवीन काही शिकायचे नाही आणि शिकायचे असेल तरी नवीन काही शोधायचे नाही.

माझ्या गुरूंनी मला एक सांगितले आहे कि तीव्र इच्छा नसेल तर जे काही होईल ते माणूस नशिबावर सोडून देतो 

मी हा जो उपक्रम चालू केला आहे तो मराठी लोकांसाठी आहे. मी म्हणत नाही कि माझ्या वेबसाईटवर या किंवा माझ्या youtube channel वर subscribe करा.

आज मी फेसबुक ला बऱ्याच ग्रुपवर message वाचतो लोकांचे कि कुठे जॉब असेल तर सांगा. मराठी लोकांचे असे message बघून खूप दुःख होते.

शेवटी जाता जाता एकच सांगेन आहे एका इनकम बरोबर दुसरे इनकम तयार करा जेणेकरून आपल्या कठीण प्रसंगी तुमच्या कामास येईल. कुठलाही चांगला (लीगल) व्यवसायाला लाजू नका. बाकीचे तर तुम्हाला माहीतच आहे. बरेचजण हा ब्लॉग वाचण्याच्या मनस्थितीत नसतील.

शेवटी मानसिकता !!!

आणखीन ब्लॉग वांचण्यासाठी लिंकवर क्लिक करा : https://packagebaba.com/blog/

coronavirus symptoms in kids : https://kidshealth.org/en/parents/coronavirus-child-is-sick.html

Leave a Comment