Digital Marketing

डिजिटल मार्केटिंग ( Digital Marketing )

Digital Marketing – डिजिटल मार्केटिंग , SEO, PPC, Content Marketing

२००० ह्या उत्क्रांती च्या काळात जर विशेष काय गोष्ट घडली असेल जी नेहमी लक्षात राहील तर ती आहे इंटरनेट चा वापर आणि त्यामुळे झालेलं सुखकर जीवन.

इंटरनेट च्या वापराचा विस्तार प्रत्येक क्षेत्रात झाला आणि त्यात मार्केटिंग हे क्षेत्र सर्वात  जास्त अग्रेसर होते .

पारंपरिक पद्धतीने जे मार्केटिंग केले जायचे त्याला जेंव्हा इंटरनेट ची जोड मिळाली तेंव्हा डिजिटल मार्केटिंग (Digital Marketing) चा उदय झाला.

हे डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय आणि त्याचा वापर व्यवसाय वृद्धीसाठी कसा केला जातो  ह्याबद्दल जाणून घेऊया.

डिजिटल मार्केटिंग Digital Marketing : इंटरनेट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर करून  जे विपणन केले जाते त्यास डिजिटल मार्केटिंग असे म्हणतात. डिजिटल मार्केटिंग मध्ये सुद्धा विविध प्रकार आहेत एक. ऑरगॅनिक मार्केटिंग आणि दुसरी पेड मार्केटिंग. ह्या दोन्ही पद्धतीचा वापर ग्राहकांपर्यंत  पोचण्यासाठी केला जातो.

डिजिटल मार्केटिंग (Digital Marketing )चे प्रकार

डिजिटल मार्केटींगचे Digital Marketing बरेच प्रकार आहेत पण आघाडीचे डिजिटल मार्केटींग तज्ज्ञ नील पटेल यांनी समर्थन केलेलं प्रकार आपण पाहूया

1. एसईएम (सर्च इंजिन मार्केटिंग)

2. एसइओ (सर्च  इंजिन ऑप्टिमायझेशन)

3. एसएमएम (सोशल मीडिया मार्केटिंग)

4. कन्टेन्ट मार्केटिंग

5. ईमेल मार्केटिंग

6. पीपीसी (पे पर क्लिक)

1.एसईएम (सर्च इंजिन मार्केटिंग)

शोध इंजिन विपणन (एसईएम) इंटरनेट मार्केटिंगचा  एक प्रकार आहे ज्यामध्ये वेबसाइट्सची जाहिरात मुख्यत्वे पेड जाहिरातींद्वारे सर्च  इंजिन रिजल्ट  पेजमध्ये  (एसईआरपी) दृश्यमानता वाढवून समाविष्ट केली जाते.

2. एसइओ (सर्च  इंजिन ऑप्टिमायझेशन) ( Seo ) Search Engine Optimization

एसईओ ही सर्च  इंजिन रिजल्ट पेजवरील ऑरगॅनिक  किंवा विना-मोबदला मिळणारी ट्राफिक  मिळविण्यासाठी आपल्या वेबसाइटला अनुकूलित करण्याची प्रक्रिया आहे

3. एसएमएम (सोशल मीडिया मार्केटिंग) ( Social Media Marketing )

सोशल मीडिया मार्केटींगमध्ये ब्रँड प्रमोशन, लक्ष्यित प्रेक्षक वाढीसाठी, वेबसाइट ट्राफिक  वाढविणे आणि विक्री वाढविणे यासाठी चॅनेल म्हणून सामाजिक प्लॅटफॉर्मचा वापर करणे समाविष्ट होते.

4. कन्टेन्ट मार्केटिंग ( Content Marketing )

एक प्रकारच मार्केटिंग  ज्यात ऑनलाइन सामग्री तयार करणे आणि सामायिक करणे (जसे की व्हिडिओ, ब्लॉग आणि सोशल मीडिया पोस्ट) यांचा समावेश आहे.  ज्या एखाद्या ब्रँडचा स्पष्टपणे प्रचार करत नाहीत परंतु त्याची उत्पादने किंवा सेवांमध्ये स्वारस्य वाढविण्याच्या उद्देशाने त्यांची निर्मिती केलेली असते.

5. ईमेल मार्केटिंग ( E-mail Marketing )

ईमेल मार्केटिंग म्हणजे  संभाव्य ग्राहक किंवा ग्राहकांशी संबंध विकसित करताना उत्पादनांचा किंवा सेवांचा प्रचार करण्यासाठी ईमेलचा वापर करणे . हे डाक सेवेऐवजी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने केले जाणारे डायरेक्ट मेल असतात .

6. पीपीसी (पे पर क्लिक) (PPC)

पे पर क्लिक एक इंटरनेट जाहिरात मॉडेल आहे जी वेबसाइट्सवर रहदारी आणण्यासाठी वापरली जाते, ज्यामध्ये जाहिरात क्लिक केली जाते तेव्हा जाहिरातदाराला प्रकाशक (सामान्यत: शोध इंजिन, वेबसाइट मालक किंवा वेबसाइटचे नेटवर्कला ) पैसे देते.

डिजिटल मार्केटिंग Digital Marketing बद्दल अधिक माहिती जाणून घेण्याआधी त्याचे फायदे काय आहेत हे  सविस्तर पाहूया.

1.जागतिक पोहोच – अर्थव्यवस्तेचे जागतिकीकरण झाल्यापासून व्यवसायांना जागतिक पातळीवर पोहचवणे एक आव्हान झाले आहे. परंतु वेबसाईट च्या माध्यमातून जागतिक पातळीवर विपणन आणि व्यापार करण्याची मुभा कमीत कमी खर्चात उपलब्ध होते.वेबसाइटच्या माध्यमातून तुम्ही तुमची वस्तू किंव्हा सेवा जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात विकू शकता.  हे पूर्ण विश्व वर्ल्ड वाईड वेब च्या माध्यमातून जोडले गेलेले आहे आणि त्याचाच उपयोग करून तुम्ही तुमचा  व्यवसाय जागतिक पातळीवर प्रदर्शित करू शकता.

2. कमी खर्चिक – योग्य नियोजित पद्धतीने टार्गेट केलेले  डिजिटल मार्केटिंग कॅम्पेन Digital Marketing हे पारंपारिक मार्केटिंग कॅम्पेन पेक्षा कमी किमतीत  योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचू शकते. जिथे पारंपारिक पद्धतीमध्ये लाखो रुपयांचा खर्च येतो तिथेच ऑनलाइन मार्केटिंग मध्ये तुम्ही शुल्लक रुपयांपासून सुरुवात करू शकता.  डिजिटल मार्केटिंग मध्ये तुम्ही दिवसाचे बजेट निश्चित करू शकता त्यामुळे खर्च  होणाऱ्या पैशांवर तुमचा योग्य ताबा राहतो आणि हे दिवसाचे बजेट किती असावे हे ठरवण्याची मुभा तुम्हाला यामध्ये  मिळते. अशा पद्धतीने कमी खर्चामध्ये तुम्ही ऑनलाईन मार्केटिंग करू शकता.

3. परिणामांच योग्य मोजमापन : – वेब अन्यालीटीक्स व इतर मेट्रिक टूल चा उपयोग करून  आपले  वेब मार्केटिंग कॅम्पेन  किती प्रभावी आहे ह्याची माहिती जाणून घेता येते. ग्राहक आपली वेबसाइट कशी वापरतात किंवा आपल्या जाहिरातीस कसा प्रतिसाद देतात याबद्दल तपशीलवार माहिती आपण मिळवू शकता. यामध्ये रियल टाइम नावाचे फिचर सद्यस्थितीमध्ये किती विजिटर तुमच्या वेबसाईट वर  कार्यरत आहेत याबद्दल सविस्तर माहिती पुरवते.  या टूलमध्ये  येणाऱ्या व्हिजिटर ची  डेमोग्राफिक (वय,लिंग,क्षेत्र ) माहिती तुम्हाला इन्फोग्राफिक चार्ट मध्ये मिळते. ज्याचा अभ्यास करून तुम्ही वेबसाईट अधिक परिणामकारक बनवू शकता आणि तुमच्या ग्राहकांची गरज चांगल्या पद्धतीने संबोधित करू शकता.

4. परिणामकारक कन्व्हर्जन रेट

व्हिजिटरचे रूपांतरण ग्राहकांमध्ये करण्याची क्षमता डिजिटल मार्केटिंग Digital Marketing मध्ये आहे. ऍडव्हर्टीसमेन्ट चे नानाविविध प्रकार (इमेज, व्हिडीओ) हे साध्य करण्यास पुरेसे आहेत. पारंपारिक पद्धतीपेक्षा ऑनलाइन पद्धतीने केलेल्या  मार्केटिंग चा कन्वर्जन रेट चांगला असतो कारण यामध्ये सर्वसमावेशक डिजिटल क्रिएटिव्ह वापरून जाहिरात तयार केली जाते यामध्ये इमेजेस, व्हिडिओ आणि  लिखित माहिती चा उपयोग केला जातो.

5. आदर्श कस्टमर ला टार्गेट करण्याची मुभा

प्रभावी मार्केटिंग कॅम्पेन साठी आपण योग्य लोकांपर्यंत पोहोचने आवश्यक आहे. आपल्याला आपल्या व्यवसायात स्वारस्य असणार्‍या लोकांपर्यंत पोहोचून आपली माहिती त्यांपर्यंत सोयीस्कर रित्या पोहचवणे शक्य होते. आपण आपली कंपनी, सेवा किंवा उत्पादनांमध्ये स्वारस्य असलेल्या ग्राहकांना विशेषत: लक्ष्य करू शकता. यामुळे आधी जो पैसा सर्वसामान्य ग्राहकांवर खर्च केला जायचा त्यावर अंकुश आला आणि जो पैसा वाचला आहे तो आदर्श ग्राहकांना आकर्षित करण्यामध्ये लावला जातो.

6. डिजिटल मार्केटिंग Digital Marketing कॅम्पेन मध्ये हवे तेंव्हा बदल करण्याची मुभा.

डिजिटल मार्केटींगचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आपण चालू मार्केटिंग कॅम्पेन मध्ये  बदल करू शकता. हे डिजिटल मार्केटिंग चे   अनन्य साधारण वैशिष्ट्ये  आहे. पारंपारिक मार्केटिंग पद्धतीमध्ये, एकदा आपण ठरविले की पुन्हा बदल करू शकत नाही. एकदा आपले फ्लायर्स किंवा आपले बिलबोर्ड तयार झाल्यानंतर आपण आपल्या मार्केटिंग कॅम्पेन  समाप्तीपर्यंत जाहिरात बदलू शकत नाही. परंतु जेव्हा आपण ऑनलाइन मार्केटिंग मध्ये कार्य  करता तेव्हा आपल्याकडे बदल करण्याची मुभा असते.आपण आपला मार्केटिंग कॅम्पेन गरजेनुसार अपडेट  करू शकता. आपल्या एसइओ कॅम्पेन कस्टमाइझ  करू शकता आणि आपल्याला आवश्यकतेनुसार आपल्या जाहिरातीचा आशय बदलू शकता. याचा अर्थ असा आहे की आपण सर्वोत्तम निकाल मिळवण्यासाठी आपला ऑनलाईन मार्केटिंग कॅम्पेन बदलू शकतो.

अनुमान:- आजच्या इंटरनेटच्या काळात जर विद्युत गतीने आपल्या व्यवसायाची वृद्धी  करायची  असेल तर डिजिटल मार्केटिंग Digital Marketing हा एक मात्र प्रभावशाली मार्ग उपलब्ध आहे.  तर तुम्ही डिजिटल मार्केटिंग Digital Marketing मधील कोणता पर्याय निवडाल हे आम्हाला खाली कमेंट मध्ये सांगा!

Some more Blog : https://packagebaba.com/internet-earning/

Youtube Video : https://www.youtube.com/watch?v=XKwNP0RqFUA

Leave a Comment