जास्तीत जास्त आयकर (Income Tax ) कसा वाचवाल.

(How to Save Maximum Tax)

मार्च महिना चालू आहे काही दिवसातच मार्च महिना चालू संपेल. चालू वर्षासाठी (१९ -२० )आयकर कसा वाचवावा आणि पुढील वर्षासाठी (२० – २१ ) साठी कर कसा वाचवाल आणि गुंतवणूक कशी करावी ह्याचे नियोजन कसे करावे.

बाजारात बरेच पर्याय असतात कर कमी करण्यासाठी उपलब्ध आहेत परंतु नेमके कुठला पर्याय आपण खरेदी करायचे ह्या बाबत संभ्रम निर्माण होतो. मराठी मध्ये कर वाचवण्यासाठी कुठले प्रॉडक्ट खरेदी करायला हवे ह्यावर मार्गदर्शन करणारा लेख नाही, ह्या लेखामध्ये आपण काही महत्वाचे पर्याय बघणार आहोत.

जे पर्याय आपण बघणार आहोत ते वापरून आपण जास्तीत जास्त कर कसा वाचवता येईल हे पाहणार आहोत.

मागील बजेट मध्ये आपल्या अर्थ मंत्र्यांनी २ कर रचना असतील असे घोषित केले होते.

  • जुनी कर रचना आणि नवीन कर रचना. 

चालू १९-२० आर्थिक वर्षासाठी जुनी कर रचना असणार आहे आणि पुढील आर्थिक (२०-२१) वर्षासाठी जुनी आणि नवीन कर रचना असणार आहेत. कर दात्यांनी  २ पैकी एक कर रचना. जो पगारदार वर्ग आहे ते एकदा निवडलेली कर रचना त्याच्या पुढील वर्षात बदलू शकतात परंतु जे व्यावसायिक आहेत ते एकदा निवडलेली कर रचना बदलू शकत नाही.

कुठली कर रचना निवडायची हे तुमच्या उत्पनावर आणि तुम्ही केलेल्या गुंतवणुकीवर अवलंबून असते. ज्यांचा पगार बऱ्यापैकी आहे ज्यांनी गृहकर्ज घेतले आहे किंवा ज्यांची गुंतवणूक बऱ्यापैकी आहे आणि ती गुंतवणूक कर कमी करण्यासाठी उपयोगी पडत असतील किंवा तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल आणि भाडे देत असाल तर तुम्ही जुनी कर रचना निवडू शकता.

१)  नवीन कर रचना (New Slab Tax Structure)

नवीन कर रचना अत्यंत सोपी आहे. त्यामध्ये आपण कशा प्रकारे कर वाचवू शकतो . नवीन कर रचनेमध्ये जास्त पर्याय नाही आहेत

  • नॅशनल पेन्शन स्कीम – ( NPS ) –  ( Sec 80 CCD (2))

हे फक्त पगारदार लोकांसाठीच आहे ह्यांच्यामध्ये तुमची कंपनी जेवढी रक्कम ह्या स्कीम मध्ये भरत असेल तेवढी तुम्हाला कर सवलत मिळेल. ह्याची मर्यादा सरकारने ठरवून दिलेली आहे ती खालील प्रमाणे

मूळ ( Basic ) वेतनाच्या १० % अधिक महागाई भत्ता एवढी रक्कम तुम्ही तुम्हाला कर वजावट म्हणून दाखवता येते.

ह्यामध्ये जर तुम्हाला तुमची कंपनी तुमचं वेतन रचना बदलायची संधी देत असेल तर ह्यामध्ये जास्त कर वजावट करता येईल. सरकारी कंपनी मध्ये हे अनिर्वार्य आहे कि काही रक्कम NPS मध्ये त्या कंपनीला भरावी लागते त्यामुळे सरकारी नोकरदारांना ह्याचा फायदा मिळतो.

२) जुनीकर रचना (Old Slab Tax Structure) 

जुन्या कर रचनांमध्ये खालील पर्याययांचा आपण फायदा घेऊ शकतो.

इथे आपण ५०००० च्या वरच्या कर सवलतीसाठी बघणार आहोत कारण कमीत कमी ५०००० कर सवलत एक साधारण व्यक्ती सहज करू शकतो.

१) घरभाडे भत्ता (House Rent Allowance) (Sec 10)

आयकर विभागाने ह्यावर कुठलीही मर्यादा ठेवलेली नाही. ह्याची मर्यादा तुमच्या पगारावर आणि तुम्ही भरत असलेल्या भाड्यावर अवलंबून असते. जर तुमचा पगार जास्त असेल आणि तुम्ही घर भाडे जास्तीचे देत असाल तर तुम्ही चांगल्याप्रकारे कर सवलत इथून मिळवू शकता

टीप – तुमचे आई वडील जर तुमच्याबरोबर राहत असतील तर त्यांच्या बँक खात्यामध्ये तुम्ही पैसे भरून त्यांचा आयकर विवरणपत्र (Income Tax Return File )करू शकता.

२) गृह कर्ज (Home Loan)

* गृहकर्जाची मुद्दल ( Sec 80 C ) –

   मर्यादा – १.५ लाख

* गृहकर्जावरील व्याज – (Sec २४ )

   मर्यादा २ लाख

अट – घरात स्वतःचे वास्तव्य (Self Occupied) असले पाहिजे आणि जर नसेल , भाड्याने दिलेले असेल (deemed Let Out) किंवा घर रिकामे असेल तर बाजार भावानुसार जेवढे घर भाडे असेल

 तेवढे तुमच्या उत्पनात दाखवावे लागेल आणि जर तुम्ही व्याज मिळत असलेल्या घर भाड्यापेक्षा जास्त भरत असाल तर तुम्हाला ते अतिरिक्त व्याज (Loss from House) कर मापनात वजावट म्हणून दाखवता येईल.

अतिरिक्त मर्यादा (Sec 80 EEE)- जर तुम्ही परवडणारे घर (४५ लाखाच्या खालील) खरेदी केले असेल आणि चालू वर्षांमध्ये त्यासाठी गृहकर्ज घेतले असेल तर त्याच्या व्याजावर १.५० लाखाची कर सवलत मिळू शकते.

म्हणजे एकूण ५ लाखापर्यंत तुम्हाला गृहकर्जावर तुम्हाला आयकरामध्ये सवलत मिळू शकते.

  • टीप – एकत्रित मालमत्ता (Joint Property / Co – Ownership )

जर सह मालकी असलेलं घर जर तुम्ही खरेदी केलेली असेल तर तुम्ही वैयक्तिक कर वाजवटीमध्ये तुम्ही घेऊ शकता

३ )शैक्षणिक कर्ज – (Education Loan) (Sec 80 E )

शैक्षणिक कर्जावरील व्याज करमुक्त आहे. ह्यावर आयकर विभागाने मर्यादा ठेवलेली नाही. हे कर्ज स्वतःसाठी,पत्नी      साठी किंवा मुलांसाठी घेतलेले असले तरी विचारात घेतले जाते. सवलतीचा कालावधी – ८ वर्षे  , देशात आणि देशाबाहेरील शिक्षणावरील कर्जावरील व्याज सुद्धा करमुक्त असते.

४) गुंतवणूक (Investment)

* पीएफ ( Employee Provident Fund) – Sec 80 C

  परतावा – ८ ते ९ % ( करमुक्त )(Taxfree)

   तुमच्या निवृत्तीनंतरच काढू शकता किंवा चालू कंपनीची नोकरी सोडल्यानंतर पैसे काढू शकता.

*शाळेची अथवा कॉलेज फी – (School & College Tution Fees) Sec 80 C 

  शाळेची किंवा कॉलेज ची फी करमुक्त आहे.

  •  आयुर्विमा – (Life Insurance) 80 C – मर्यादा १.५० लाख

आयुर्विम्यामध्ये २ परताव्यावर मुख्यत्वे परताव्याच्या दृष्टीने २ प्रकार पडतात.

१) निश्चित परतवा ( Endowment Plan ) – ह्या विम्याचा परतावा एका विशिष्ट कालावधीनंतर विमाधारकाला किंवा विमाधारकाला मृत्यू झ्हाला तर त्याच्या वारसाला मिळतो. ह्याचा परतावा खूप कमी असतो.

२) मुदत विमा (Term Insurance ) – विमा कंपनी आणि विमाधारकांमध्ये ठरलेल्या करारामध्ये मृत्यूचे वय ठरवले जाते कि एका विशिष्ट वयाच्या अगोदर मृत्यू झाल्यास वारसाला पैसे दिले जातील. त्यामध्ये इतर हि काही अटी असतात ह्या विम्याचा परतावा विमाधारकाच्या मृत्यूनंतर विमाधाराच्या वारसाला मिळतो.

ह्यामध्ये वरीलपैकी टर्म इन्शुरन्स घ्या आणि बाकीचे पैसे म्युच्युअल फंड स्टॉक आणि रिअल इस्टेट मध्ये टाकू शकता.

  • ELSS (Equity Linked Saving Scheme) 80 C – मर्यादा १.५० लाख.

 हे एक करबचत म्युच्युअल फंड असतात. ह्यामध्ये म्युच्युअल फंड सारखा १२ ते १३ % चा परतावा मिळतो. ३ वर्षानंतर तुम्ही हे पैसे काढू शकता. परतावा जर १ लाखापेक्षा जास्त असेल तर भांडवली लाभ कर (Capital  Gain Tax) भरावा लागतो.

** निश्चित उत्पन्न ठेव (Fixed Income Deposit) – 80 C – मर्यादा १.लाख.**

  1. सुकन्या समृद्धी योजना – (80 C – मर्यादा १.लाख.)

हि योजना घेण्यासाठी योजना घेणार्यांचे अपत्य मुलगी असली पाहिजे. हे संपूर्ण करमुक्त असते. ह्या योजनेमधी पैसे मुलीच्या वयाच्या २१ व्या वर्षी काढू शकता. ८ ते ९ % परतावा मिळतो.

  • PPF (पब्लिक प्रॉव्हिडन्ट फंड )आणि  VPF (व्होलंटियर प्रॉव्हिडन्ट फंड )

 (80 C – मर्यादा १.५ लाख.)

वरील दोन्ही पण गुंतवणूक १५ वर्षापर्यंत काढू शकत नाही. परतावा ८ ते ९ %.

निकडीच्या (emergency) वेळी काही रक्कम काढू शकता.

पूर्णतः करमुक्त आहे.

** इतर मुदत ठेवी  (Sec 80 C – मर्यादा १.लाख.) **                               

१) पोस्ट ऑफिस ठेवी.                                                                                   कमीत कमी कालावधी ५ वर्षे

२) राष्ट्रीय प्रमाणपत्र योजना. (national certificate scheme)                       परतावा करयुक्त

३) जेष्ठ नागरिक ठेवी.

४) करबचत ठेवी.

**इतर पर्याय**

* आरोग्य विमा – मर्यादा ५० हजार ते १ लाख ( Sec 80 D)

स्वतः आणि कुटुंबासाठी

*देणगी – ( Sec 80 G)

   करमुक्त आहे कि नाही हे देणगी देण्याअगोदर तपासून पाहावे.

Leave a Comment