Soclal Media Marketing

Social Media Marketing ( सोशिअल मीडिया मार्केटिंग ) Top 4

Social Media Marketing in Marathi

भारतामध्ये दिवसागणिक वाढ होत असलेल्या इंटरनेट वापराचा परिणाम सर्व क्षेत्रात होत आहे. त्यामध्ये  सोशल मीडिया आणि सोशल मीडिया मार्केटिंग हे दोन अविभाज्य घटक आहेत. सोशिअल  मीडिया मार्केटिंग हा शब्द जरी नवखा आणि टेक्निकल  वाटत असेल तरी आपण नकळत दैनंदिन जीवनात ह्या ऑनलाईन  मीडिया मार्केटिंग च्या कार्यात आपला योगदान देत असतो.

सोशिअल  मीडिया मार्केटिंग मध्ये सरळ उडी ना घेता आधी समजून  घेऊ सोशिअल  मीडिया म्हणजे  काय आणि आपण त्याचा वापर कसा आणि किती करतो?

सोशल मीडिया:- (Social Media) Marketing

सोशल मीडिया म्हणजे वेबसाइट्स आणि आप्लिकेशन चा एक डिजिटल व्यासपीठ  जिथे लोक आपल्या विचारांचे आणि माहितीचे मुक्त हस्तपणे आदाण -प्रदाण  करतात. माहितीचा  स्वरूप काहीही असू शकतो (लिखित, विडिओ किंवा चित्र ). माहितीच्या आदान प्रदान करताना ह्या व्यासपीठावर एकमेकांशी संवाद सुद्धा साधू शकता.

शाऊट  मी लाउड  हि भारतीय सोशल मीडिया मार्केटिंग एजेन्सी सध्या अग्रेसर आहे

आता आपण जाणून घेऊया सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे काय? Social Media Marketing

सोशल मेडिया मार्केटिंग:-

सोशल मेडिया मार्केटिंग म्हणजे सोशल मीडियाचा उपयोग करून मार्केटर/व्यावसायिक आपल्या व्यवसायाबद्दल ची माहिती त्याच्या ग्राहक किंवा प्रेक्षकांपर्यंत विविध माध्यमातून पोहोचून त्यांना आपल्या वेबसाईट आणि सोशल मीडिया प्रोफाईलला भेट देण्यासं  प्रोत्साहित करणे आणि त्यातून आपला निश्चित हेतू साध्य करणे होय.

सोशल मीडिया मार्केटिंग केवळ माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे एवढाच नसून त्याचे वेगवेगळे उद्देश्य आहेत ते आपण पाहूया.

1. माहितीच आदान प्रदान:-

सोशल मेडिया मार्केटिंगचा Social Media Marketing उपयोग तुम्ही स्वतःसाठी किंवा व्यवसायासाठी उपयुक्त माहिती आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी करू शकता.

वैयक्तिक पातळीवर तुम्ही आपल्या आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या-वाईट घडामोडी इतरांशी अगदी एका स्लीकमध्ये आपल्या आप्तजनांसोबत शेअर करू शकता.  त्यासाठी सोशल मीडिया एक चांगला व्यासपीठ आहे.

आणि व्यवसायासाठी जर तुम्ही सोशल मीडियाचा विचार केलात  तर व्यवसायामध्ये तुम्ही कुठल्या वस्तू आणि सेवा प्रदान करता याबद्दलची माहिती तुम्ही आपल्या ग्राहकांसोबत शेअर करू शकता.

कोकाकोला ही कंपनी दरवर्षी जगभरात सोशल मीडिया  मार्केटिंग करण्यासाठी अरबो  रुपये खर्च करते

Social Media Marketing

2. लोकांबद्दल जाणून घेणे

सोशल मीडियाचा उपयोग ज्या पद्धतीने माहितीचे आदान-प्रदान करण्यासाठी होतो त्याच पद्धतीने लोकांबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हि होतो. जसे कि जेंव्हा तुमचे आप्तजन सोशल  मीडिया वर काही माहिती अपडेट करतात तर ती तुम्हाला तात्काळ नोटिफिकेशन च्या माध्यमातून समजते.

3. मत प्रदर्शित करणे 

सोशल मेडिया ला सर्वात जास्त पसंती मिळण्याचे कारण म्हणजे तुम्ही आपले मत स्वतंत्रपणे प्रदर्शित करू शकता. आजकाल सर्व सामान्य लोकांना जर मत प्रदर्शित करायचे असेल तर सोशल मीडिया शिवाय दुसरा मोफत पर्याय उपलब्ध नाहीये. त्यामुळे लोकांचा ह्याला भरगोस प्रतिसाद मिळतो आहे.

जगात लक्षावधी सोशल नेटवर्क व्यासपीठ उपलब्ध आहेत. परंतु भारतामध्ये सर्वात लोकप्रिय असे मोजकेच सोशल मीडिया आहेत, तर एक-एक करून त्या बद्दल आपण माहिती जाणून घेऊया.

भारतातील सर्व लोकप्रिय सोशल नेटवर्क व्यासपीठ(Popular Network) Social Media Marketing

1. व्हॉट्सऍप (Whatapps)

2. फेसबूक (Facebook)

3. युट्युब (Youtube)

4. इंस्टाग्राम (Instagram)

Social Media Marketing

1. व्हॉट्सऍप (Whatsapps)

व्हाट्सअप  हे संदेशांचे इंटरनेट मार्फत आदान प्रदान करण्याचे एक मोफत साधन आहे.  व्हाट्सअप च्या माध्यमातून तुम्ही लिखित स्वरुपाचा  तसेच इमेज आणि व्हिडिओ पद्धतीचे संदेश आदान प्रदान करू शकता.  भारतामध्ये व्हाट्सअप वापरणाऱ्यांची संख्या ४० करोड आहे आणि दिवसेंदिवस यामध्ये वाढ होत चाललेली आहे.

2. फेसबूक (Facebook)

फेसबुक ही एक सोशल नेटवर्किंग साइट आहे जी आपल्यास कुटुंब आणि मित्रांसह ऑनलाइन कनेक्टआणि शेर करण्यासाठी  उपयुक्त आहे . आज फेसबुक जगातील सर्वात मोठे सोशल नेटवर्क आहे, जगभरात २ अब्जाहून अधिक लोक त्याचा वापर करतात.

3. युट्युब (Youtube)

युट्युब  एक विनामूल्य व्हिडिओ प्रसारित करण्याची वेबसाइट आहे जी इंटरनेट च्या साधनाने ऑनलाइन व्हिडिओ पाहणे सुलभ करते. आपण इतरांसह आपले विडिओ सामायिक करण्यासाठी आपले स्वतःचे व्हिडिओ तयार आणि अपलोड देखील करू शकता.

युट्युब हे जगातील दोन नंबरचे सर्च इंजिन देखील आहे. खूप सारे लोक युट्युब वर विविध विषयांबद्दल माहिती देणारे विडिओ तयार करून प्रदर्शित करतात. आजकाल युट्युबचा वापर व्यापारीकरणासाठी देखील केला जातो. विविध कंपन्या त्यांच्या वस्तू आणि सेवांबद्द्दल माहिती देणारे व्हिडीओ युट्युब वर प्रदर्शित करतात.

4. इंस्टाग्राम (Instagram)

इन्स्टाग्राम एक विनामूल्य फोटो आणि व्हिडिओ सामायिकरण करण्याचे एप्लीकेशन आहे. लोक इंस्टाग्राम वर फोटो किंवा व्हिडिओ अपलोड करू शकतात आणि त्यांना त्यांच्या फॉलोवर्स  किंवा मित्रांच्या निवडक गटासह सामायिक करू शकतात. आपण आपल्या  मित्रांद्वारे इन्स्टाग्रामवर सामायिक केलेल्या पोस्ट देखील पाहू शकतो., त्यावर कमेंट देऊ शकतो आणि वेळप्रसंगी पसंत हि  करू शकतो.

इंस्टाग्राम चा उपयोग आजकाल मार्केटिंगसाठी सर्वात जास्त केला जातो कारण या सोशल नेटवर्कवर लोकांची सर्वात जास्त एंगेजमेंट पहावयास मिळते.

सोशल मीडिया मार्केटिंग सर्वांसाठीच आहे परंतु मुख्यत्वे दोन घटकांसाठी सर्वात जास्त कारीगर आहे

1. वैयक्तिक

2.व्यावसायिक

1. वैयक्तिक (Personal)

सोशल मीडियाचा उपयोग तुम्ही वैयक्तिक बाबींसाठी करू शकता तसेच समाजातील प्रत्येक घटकाशी संबंध प्रस्तापित करण्यासाठी  तुम्ही विविध माहिती आणि गोष्टी यावर उपलब्ध करून देऊ शकता. तसेच जर तुमच्या अंगी एखादी कला असेल तर ती  प्रदर्शित करण्यासाठी  सोशल मीडिया एक उत्तम साधन आहे. तुम्ही तुमच्या कलेचे वेगवेगळे नमुने लोकांसाठी सोशल नेटवर्क वर प्रदर्शित करू शकता. जेणेकरून तुमची कला लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्यास लोकांची दाद हि मिळेल.

वैयक्तिक कामासाठी सोशल मीडियाचा उपयोग करून तुम्ही घर बसल्या आपल्या व्यवसायासाठी लाखो रुपयांचा व्यवहार करू शकता.

Social Media Marketing

2.व्यावसायिक (Commercial)

व्यवसायिक मार्केटिंग मध्ये सोशल मीडिया मार्केटिंग हा अविभाज्य घटक आहे कारण  व्यावसायिकांना जाहिराती व्यतिरिक्त आपल्या ग्राहकांची संवाद साधण्याचं एकमात्र साधन म्हणजे  आहे.

व्यावसायिक सोशिअल नेटवर्क च्या माध्यमातून आपल्या वस्तू आणि सेवांबाबद्दल ग्राहकांना जागरूक करत असतो त्याच बरोबर जर ग्राहकांच्या  जर काही सूचना आणि अडी अडचणी असतील तर त्यांचं योग्य पद्धीतीने संगोपन केले जाते.

सोसिअल मीडिया हे मुक्त व्यासपीठ असल्या कारणाने व्यावसायिकांना बाजारात लोकांचे त्यांच्या ब्रँड बद्दल काय मत आहे हे चांगल्या पद्धतीने समजते. तसेच सोशिअल मीडिया नेटवर्क व्यतिरिक्त  ग्राहकांच्या गरजा जाणून घेण्याचे दुसरे प्रभावी माध्यम उपलब्ध असेल असे मला वाटत नाही.

सोशल मीडिया मार्केटिंग चे फायदे (Social Media Marketing)

1. वेगवान आणि सुलभ संभाषण (Fast & Clear Conversation)

ग्राहक सोशल मीडियाच्या प्रतिनिधींशी जलद आणि सुलभ संपर्क साधू शकतात. व्यवसाय ग्राहकांच्या तक्रारींना पूर्वीपेक्षा वेगवान आणि सुलभ प्रतिसाद देऊ शकतात.

Soclai Media Marketing

2. वेबसाइट ट्राफिक वाढवणे (Increased Traffic )

वेबसाईट हे ऑनलाईन मार्केटिंग चे मुख्य साधन आहे तर या वेबसाईटवर लोकांचे ट्रॅफिक वाढवण्यासाठी सोशल मीडियाचा उपयोग सगळ्यात प्रभावीपणे केला जातो.

3. ऑरगॅनिक पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचणे (Organic Reach)

सोशल मेडिया नेटवर्क हे मोफत असल्यामुळे  जेवढे तुम्ही लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी याचा वापर कराल तेवढ फायदेशीर आहे.  कारण बिना पैसे खर्च करता व्यावसायिक वेगवेगळ्या माध्यमांच्या जोरावर  ऑरगॅनिक पद्धतींने  मार्केटिंग करू शकतात आणि ऑरगॅनिक पद्धतीने लोकांपर्यंत पोहचू शकतात.

Social Media Marketing

Leave a Comment